Friday, April 29, 2011

विचार करू तरी किती?

विचार करू तरी किती?
विचार करू तरी किती?
यावर्षी म्हणे पुन्हा करतो शेती
शेतीचे नाव काढताच वाटते भिती
कारण शेतीनेच केली बेकार गती
आता तुम्हीच सांगा विचार करू तरी किती? ।।१।।
यावर्षी तरी पिक होईल म्हणे अती
म्हणुन मागील वर्षी केली होती शेती
परंतु कापसाच्या झाल्या फक्त वाती
आता तुम्हीच सांगा विचार करू तरी किती? ।।२।।
शेतात नुसते कष्ट करती
सोयाबिनचे भरेल वाटले होते पोती
पण, पोत्याची झाली अर्धी भरती
आता तुम्हीच सांगा विचार करू तरी किती? ।।३।।
शेतात पिक सगळेच लावती
परंतु आमचे पिक गडी, ढोरे खाती
कर्जाचे डोंगर चढतच जाती
तुम्हीच सांगा विचार करू तरी किती? ।।४।।
केव्हा पैसा येईल हाती
असे, कर्जदार कर्जाचे गीत गाती
कर्जामुळे तुटत आहे नाती
आता तुम्हीच सांगा विचार करू तरी किती?।।५।.
शेती म्हणताच भरते धास्ती
यावर्षी तरी होईल का कायमची वस्ती
देवाजवळ लावतो मी पणती
आता तुम्हीच सांगा विचार करू तरी किती?।।६।।
बंद करा शेतीची भटकंती
कारण गहाण ठेवायला नाही संपत्ती
आता घ्या निवृत्तीची विश्रांती
हीच आम्हा सर्वांची विनंती ।।७।।
रचियता
अभिनव बडवे पांढरकवडा
९४०३७४०६५७

Sunday, April 6, 2008

आत्महत्या देशाला काळीमा फासणाय्रा - किशोर तिवारी

आत्महत्या देशाला काळीमा फासणाय्रा - किशोर तिवारी
सांगा अश्रृंचा रंग कोणता ?आत्महत्या देशाला काळीमा फासणाय्रा - किशोर तिवारी
www.vidarbhanews.blogspot.com
www.dainikyavatmalnews.com
www.kishortiwari.blogspot.com
राज्य सरकारने चार हजार कोटींचा शिलकी अर्थसंकल्प सादर केला. परंतु कापुस उत्पादक शेतकय्रांना मदत, अन्न सुरक्षा, आरोग्य सुरक्षा व शिक्षणावर सवलत, यासारख्या आत्महत्या रोखण्याच्या उपायावर एक दमडीही दिली नाही.- किशोर तिवारी, अध्यक्ष विदर्भ जनआंदोलन समिती
यवतमाळ - देशातील राजकीय नेते जेव्हा रंगपंचमीच्या रंगात रंगत होते, त्याचवेळी विदर्भातील १० कापुस उत्पादक शेतकय्रांच्या घरात त्यांचे कुटुंबिय आत्महत्येचा शोक व्यक्त करून अश्रृंचा रंग कोणता याचे उत्तर शोधत होते, अशी प्रतिक्रीया विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे. होळी सणाच्या दरम्यान जनआंदोलन समितीला प्राप्त झालेल्या आकडेवाडी नुसार विदर्भातील दहा कापुस उत्पादक शेतकय्रांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली आहे. या आत्महत्या म्हणजे स्वतंत्र भारताला काळीमा फासणारी घटना असल्याचे मत तिवारी यांनी व्यक्त केले आहे. होळी सणाचे दरम्यान ७२ तासात मनोहर शालीग्राम राऊत (अंतरगांव जि. यवतमाळ), विठ्ठल दडमल (रा. गोजी जि. वर्धा), सुखदेव सुरपाडी रा गाढा जि. नागपुर), दिगांबर भिमराव मुळे (रा. गोध्री जि. बुलढाणा), शालिक गोमाजी राऊत (रा. टेंभरी जि. भंडारा), विनोद शेळके (रा. बिरसिंगपुर जि. भंडारा), सुरेश जागृत रा. हिवरखेड जि.बुलढाणा), पांडुरंग धर्मा इंगळे (रा. झोगडा जि. बुलढाणा) प्रमोद फसले (रा. हनवाडी जि. अकोला), पतरू नानाजी वाढई (रा. लेखा जि. गडचिरोली), या विदर्भातील १० कापुस उत्पादक शेतकय्रांनी नापिकी, कर्जबाजीरी पणामुळे आपली जिवनयात्रा संपविली आहे. कर्जमाफिनंतरही विदर्भातील शेतकय्रांचे आत्महत्येचे सत्र थांबलेले दिसुन येत नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतात, म्हणुन संपुर्ण भारतातील चार कोटी शेतकय्रांना ६० हजार कोटींची कर्जमाफी दिल्यानंतरही सरकार खात्याने दोन हेक्टर व ३१ मार्च २००७ ची अट जाहीर केल्यामुळे विदर्भातील ३४ हजार शेतकरीच कर्जमाफीला पात्र ठरले आहेत. राज्य सरकारने गाजावाजा करून शेतकरी अर्थसंकल्प सादर केला. परंतु, विदर्भातील शेतकय्रांना दमडीही दिली नाही. त्यामुळेच शेतकय्रांच्या आत्महत्येचे सत्र थांबायचे नाव घेत नाही परिणामी शेतकरी आत्महत्येत वाढ होत आहे. कर्जमाफी देतांना देशभरातील ९० टक्के शेतकय्रांना सरकारने वंचीत ठेवले आहे. राज्य सरकार कापुस उत्पादक शेतकय्रांसाठी भरघोस मदत करील अशी आशा शेतकय्रांना होती. परंतु अर्थमंत्री जयंत पाटील यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात पुन्हा एकदा विदर्भातील कापुस उत्पादक शेतकय्रांची निराशाच झाली आहे. अशी टिका किशोर तिवारी यांनी केली. राज्यात आघाडी सरकारच्या कार्यकाळात कापुस उत्पादक शेतकय्रांमध्ये निराशा वाढीस लागली. कर्जबाजारीपणामुळे ८ तासाला एका शेतकय्राने आत्महत्या केली. दरम्यान, विस हजारांवर शेतकय्रांनी आत्महत्या केल्याचेही तिवारी यांनी म्हटले आहे. शेतकय्रांना कापसाचा अग्रीम बोनस म्हणुन प्रती हेक्टर दोन हजार अशी मदत यावर्षी घोषीत करण्यात येईल. तसेच शेतकय्रांच्या सावकारी कर्जाचे पुनर्वसन करण्यासाठी सरकार तरतुद करेल, अशी घोषणा सरकारने केली होती. याकडे जनआंदोलन समितीने लक्ष वेधले आहे.

Nine (9) more vidarbha farm suicides in april too:distressed farmers failed to get relief , Nagpur- Dated-6th april2008 http://kishortiwari.blogspot.com/ The announcement of Indian finance Minister P.chitambram to provide loan waiver up to 2 hector has brought despondency and gloom in vidarbha cotton region as most effected debt trapped 90% farm families are not being covered in loan waiver package due to 2 hector limit cap as average land holding on record in rain fed and dry land farming area of west vidarbha is 2.4 hector resulting 9 more farm suicides in last three days of april-2008 ,recent victims are 1.PANDURANG SURPAM IN YAVATMAL2.SANTOSH GOPAWAR IN YAVATMAL3.ARUN NAMDEO HADE IN BULDHANA4.SURSHABHAN RATHODE IN YAVATMAL5.DHYANABA BORKAR INWASHIM6. UDHHAO SIRASKAR IN AKOLA 7.RAMDAS CHINCHOLKAR IN AKOLA8.SURESH LONAGARE IN BULDHANA9.RAJESH TEKADE IN AKOLA Taking this 9 farm suicides in total 255 have committed suicides as per reports published in local media kishor tiwari of vidarbha jan andolan samiti informed in a press note today.vidarbha grarian crisis which has reported around 36,600 cotton farmers suicides since 1995 after the free trade era has started . Vidarbha Jan Andolan Samiti(VJAS) who are the unsung custodian of agrarian crisis has asked has apposed the condition of 2 hector in laon waiver package and urged to give loan waiver to all farmers with out any limit of land or crop loan limit as this will cover all debt trapped distress farmers and VJAS also demanded that only loan waiver will not address that issue unless and until the fresh five credit cycle is given to all farmers and income base package to farmers hence cost of cotton is as important as debt crisis are hence cotton price is the issue is too important ti address the vidarbha agrarian crisis,kishor tiwari added. VJAS to urged integrated relief package to vidarbha agrarian crisis Recently it was told by UPA chairperson smt.sonia Gandhi that loan waiver limit of 2 hector will be increased up to 5 hector for vidarbha cotton farmers but now it is learnt that union agriculture minister sharad pawar ,finance minister P.C. and monteksingh aluwalia has been trying level best not make any changes in announced loan waiver as govt. is finding difficlu to fulfil the first one which already announced hence main denad of distress cotton farmers for complete loan waiver of in rain fed suicide porn district of west vidarbha alongwith food security ,health security,rural employment,value addition project and market facility with govt. intervention on price front are likely to be shown dustbin,tiwari added. VJAS has been demanding since 2006 that cotton belt of vidarbha should be decleared "GM free" organic zone as recommended by national commission of farmer (NCF).Vidarbha Jan Andolan Samiti(VJAS) in letter to Indian finance minister p.chidambram asked to provide special budgetary allocation to redress hardship of dying farmers and provide solution to agrarian crisis in light with new national farmer policy .Issue of prevailing distress in the agrarian community is very serious as year 2007 has reported much more farm suicides in other region of Maharashtra too, kishor tiwari of Vidarbha Jan andolan Samiti informed today in press note. VJAS urged FM the issue of providing credit and cost cover to dying cotton farmers are vital due increase in higher subsidies and instability in cost hence price stabilization fund is needed along with complete loan waiver and regulated credit supply from state controlled Banks. the step to reduce the input cost of cultivation the regulator for seed and pesticide is must.The provision to provide insurance cover to cash crop on village level ,the direct food security ,health care security and rural employment growth in agrarian crisis prone should be given special budgetary allocation in order to stop on going farmers suicides.VJAS has apposed administration's another formula to giving interest waiver and short loan waiver to small marginal farmers land holding up to 2 hector or so . "this will be mockery of loan waiver demand of debt trapped distressed cotton farmers as this loan waiver will not cover more than 60 thousand farmers out of 12 lacs 80 thousands debt trapped suicide prone farmers" kishor tiwari of vidarbha jan andolan samiti informed today in press note. VJAS has requested finance minister to start NFSM (National food security mission) and special outlay of RKVY(Rashtriya krishi vikas yojana) along with a comprehensive policy for land rights to landless, marginal farmers and tribals cultivating barren land for vidarbha and the demand to allocate dedicated funds on the lines of AIBP for farm ponds, community tanks and give incentives to farmers/villages who/which harness water but nobody in the administration is serious over the vidarbha agrarian crisis ,tiwari added. .

Tuesday, January 15, 2008

अर्ली - पिंपळशेंडा मार्गावरआँटो पलटुन १ ठार ७ जखमी

अर्ली - पिंपळशेंडा मार्गावरआँटो पलटुन १ ठार ७ जखमी पाटणबोरी - पिंपळशेंडा मार्गावरआँटो पलटुन १ ठार तर ७ जखमी झाल्याची घटना आज दुपारी १.३० च्या दरम्यान घडली

Saturday, January 12, 2008

यवतमाळच्या चेतनकुमार मेश्राम यांचेवर इंग्लंड येथे वर्णवादामुळे झालेल्या अन्यायाचा विदर्भ जनआंदोलन समितीतर्फे निषेध

नागपुर (पांढरकवडा) ४ जानेवारी - यवतमाळ जिल्हयातील शोषीत व उपेक्षीत मागास समाजातुन येऊन भारताच्या इंडियन इन्स्टिट्युट आँफ टेक्नाँलाँजी (आय आय टी ) मधुन इंजीनियर झालेल्या व जगातील सर्वात विख्यात नाँर्थांटन विद्यापिठात एम बी ए चे व्यवसायी शिक्षण घेणारया विद्यार्थ्याला ब्रिटीश येथील विख्यात दुरध्वनी कंपनी व्दारे वर्णवाद निर्माण करून झालेल्या छळाचा निषेध विदर्भ जनआंदोलन समिती ने केला आहे. भारताच्या महामहिम व विदर्भाच्या सुन असलेल्या प्रतिभाताई पाटील यांनी या प्रकरणात ब्रिटीश सरकारने माफी मागण्यासाठी दबाव टाकावा अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी व युवा नेते रितेश परचाके यांनी फँक्स द्वारे केली आहे. या संबंधात पाठविलेल्या निवेदनात तिवारी यांनी म्हटले आहे की, विदर्भातील यवतमाळ सारख्या मागास भागातुन व समाजातील सर्वात वंचीत असलेल्या शोषीत व उपेक्षीत वर्गातून आपल्या बुध्दीच्या भरोश्यावर आय. आय. टी मधुन बी टेक ची पदवी घेवुन जगातील सर्वात मोठ्या नाँर्थान्टन विद्यापीठातुन व्यवसायी शिक्षण घेणारया २६ वर्षीय चेतनकुमार मेश्रामवर भारतीय मुळाचा वर्णवाद ठेवुन ब्रिटनच्या एका कंपनीने त्याचा छळ केला होता. ब्रिटनच्या न्यायालयात हे प्रकरण होते. मेश्राम यांचे बाजुने निकाल लागुन २ महिने लोटुनही त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे हे प्रकरण आता भारतीयांच्या अस्मितेचे झाले आहे. यवतमाळ जिल्हयातील चेतनकुमार मेश्राम यांचा अपमान हा भारतीयांचा अपमान असुन हे प्रकरण आपण भारतीय दुतावासा मार्फत पुढे रेटणार असुन या प्रकरणात विदर्भ जनआंदोलन समिती १४ तारखेला धरणे आंदोलन सुध्दा करणार असल्याची माहिती किशोर तिवारी यांनी दिली. यवतमाळच्या चेतनकुमार मेश्राम यांचे प्रकरणामध्ये विदर्भातील जनतेने आवाज उठवावा असे आवाहन किशोर तिवारी यांनी केले आहे.

Wel Come To my site

Hello,
I am Ritesh Parchake
NGO
my Email - ritesh.parchake@gmail.com
and other site is www.dainikyavatmalnews.com

My No Phone No is 07235 - 227037

MObile No is 9422560462

Address is - Sardar Patel Ward,
Pandharkawada Dist Yavatmal 445302 Maharashtra State India